Home Breaking News भारतीय महाक्रांती सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार ! समाजकारणाची आवड असणाऱ्या व्यक्तींनी...

भारतीय महाक्रांती सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार ! समाजकारणाची आवड असणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधण्याचे आवाहन .

376
0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

भारतीय महाक्रांती सेनेची सध्या जिल्हा पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. समाजकार्य करण्यास इच्छुक युवक व्यक्तींनी तातडीने संपर्क करण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष ज्ञानेश्वर ताकोते पाटील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रा वैभव दाभाडे यांनी केले आहे
भारतीय महाक्रांती सेना एक सामाजिक संघटना असून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या भागात भारतीय महाक्रांती सेनेचे सामाजिक कार्य प्रशंसनीय आहे कोरोना काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक गरजूंना भरघोस मदत करण्यात आली आहे या काळात सर्वप्रथम भारतीय महाक्रांती सेनेच्या माध्यमातून समाजासाठी देशासाठी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला होता.सर्वप्रथम विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात त्या त्या विभागात जाऊन कोरोना काळात सुद्धा कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला होता. भारतीय महाक्रांती सेना समाजासाठी देशासाठी कार्य करत आहे.
विदर्भात व बुलढाणा जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी तसेच बुलढाणा जिल्ह्यात संघटनेचे पदाधिकारी शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, यांची निवड करण्याची प्रक्रिया होत आहे समाजासाठी धडपडणाऱ्या कार्य करु इच्छीत असणाऱ्या युवकांसाठी भारतीय महाक्रांती सेना सतत पुढे असते अशाच युवकांना एक सुवर्णसंधी भारतीय महाक्रांती क्रांती सेनेच्या माध्यमातून मिळत आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर 7066432459

Previous articleकुवरदेव येथील वनामधून अवैधरित्या गोंध तस्करी करताना 3 आरोपी अटकेत तर 6 जण फरार.आरोपीजवळुन 21 हजार रुपयांचा सलाई गोंद जप्त…
Next articleचिखली शहरातुन जाणार्या महामार्गावर रबलींग स्ट्रीप टाकुण वाहनांना स्पिड लिमिड बांधा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here