सुनील पवार, नांदुरा, प्रतिनिधि
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम पंचायत हद्दीत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने मलकापूर मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजेश एकडे यांनी संबधीत सर्व विभागाची आढावा बैठक आयोजित केली होती.सदर योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सिंचन विहिरी,शेत रस्ते पांदण रस्ते,खडीकरण,पक्के रस्ते करणे, गाई-म्हशीचे पक्के गोठे बांधणे,
कुकुटपालन शेड बांधणे,फलबाग लागवड,वृक्षरोपण,
रोपीकरण, शेततळे,ढाळीचे बांध,वनतळे,
अंगणवाडी बांधकाम, शौचालय बांधकाम या सह करावयाचे इतर कामाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना आमदार राजेश एकडे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना केल्या. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या या आढावा बैठकीस नांदुरा येथील तहसीलदार श्री.राहुल तायडे,नांदुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी श्री. पुरुषोत्तम अंगाईत, वनविभागाच्या जळगाव जामोद च्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिताताई राजहंस,मलकापुर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.सोळंके यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.