मोताळा:- मुक्ताईनगर येथे आज दिनांक 7 मार्च 2021 ला शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय लुकमान शाह यांचे अध्यक्षतेखाली पत्रकारांची बैठक आयोजित करून सदरचे बैठकीत विविध विषयावर चर्चा करून सर्वानुमते जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी मोहन मेढे तर जिल्हा सचिव पदी शब्बीर भाई यांचे निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की.
महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांचे संघटन करून अन्याय-अत्याचार झाल्यास सदैव पत्रकारांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हे संघटना काळजीपूर्वक प्रत्येक जिल्ह्यात आज तगायत करीत आहे बातमी संकलन करीत असताना येणारे वेगवेगळे अनुभव अधिकारी देत असलेली वागणूक पत्रकारांवर होणारे हल्ले असे एक ना अनेक विषयावरती चर्चा करून संस्थापक अध्यक्ष माननीय लुकमान शाह यांनी संघटनेचे महत्त्व व ध्येयधोरण पटवून सांगितले जळगाव जिल्हा अध्यक्षपदीमोहन मेढे मुक्ताईनगर यांची तर शब्बीर भाई हिंगोणा यांची जिल्हा सचिव पदी आणि शेख आतिक व मुबारक तडवी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले .व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुक्ताईनगर तालुक्याची तालुका कार्यकारिणी देखील उपस्थित पत्रकार बांधव यांचेतुनच घोषित करण्यात आली .
मुक्ताईनगर तालुका कार्यकारिणी:-
तालुकाध्यक्ष श्री सतीश गायकवाड तालुका सचिव श्री अमोल वैद्य शहराध्यक्ष श्री रिजवान भाई शहर उपाध्यक्ष श्री अजगर शेख तालुका संघटक श्री दिनकर भालेराव तालुका संघटक मुक्ताररब्बानी तालुका संघटक श्री कैलास कोळी तालुका संघटक वसीम कुरेशी तर आधी पत्रकार बांधवांचे सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन संस्थापक अध्यक्ष माननीय लुकमानशाह यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता झाली सूत्रसंचालन व आभार अजगर भाई यांनी मानले.