महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार प्राप्त मुर्तीकर हरीभाऊ राऊत यांच्या पत्नी चे दु:खद निधन* सर्व पत्रकार बांधवाकडुन राऊत परीवार यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट_ !
मेहकर प्रतिनिधी ता. आई खरचं काय असते, लेकराची माय असते,वासराची गाय असते,दुधाची साय असते,लंगड्याचा पाय असते,धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही, खरंच जन्माला आल्यानंतर ती स्वतःसाठी कधी जगतच नाही ते आपले कुटुंब यासाठी जगत असते खरंतर मातृदिन हा आईच्या प्रेमातून उतराई होण्याचा एक दिवस असतो परंतु त्याच दिवशी कुटुंबातील सर्वच मुलांना आईला माझीच्या जाण्याने पोरक होण्याची वेळ आली असा प्रसंग देऊळगाव माळी येथील राऊत परिवाराला आला सविस्तर वृत्त असे की मातृदिनाच्या दिवशी मुलगा आईचं स्टेटस ठेवतो वाढदिवसाची तयारी करतो आणि त्याच रात्री आईला अचानक मध्यरात्री हृदयविकाराचा झटका येऊन आई जगाचा निरोप घेत आहे यापेक्षा दुर्दैव कोणता असू शकत , देऊळगाव माळी येथील महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मूर्तिकार पुरस्कार प्राप्त मूर्तिकार हरिभाऊ राजाराम राऊत यांच्या पत्नी व पत्रकार कैलास हरिभाऊ राऊत यांच्या मातोश्री शांताबाई हरीभाऊ राऊत वय वर्ष 78 यांचे ८मे रोजी मातृदिनाच्या रात्री जेवण करून सर्वांना अतिशय मनमोकळेपणाने बोलतात आणि झोपी जातात परंतु दुसऱ्या दिवशी झोपेतून उठवताना उठत नाही मात्र कायमच्या चिरनिद्रिस्त होता यापेक्षा दुर्दैवी धक्का असू शकत नाही,राञीत्यांचा तीव्र धक्का येऊन त्यांचा मृत्यू होतो असं एकाकी जाण्याची दुर्दैवी वेळ कोणावर येऊ नये , यावेळी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जेष्ठ पञकार. सिद्धेश्वर पवार , पञकार उद्धव फंगाळ, पञकार अंकुश राठोड ,पञकारअनिल मंजुळकर , पञकार किसन लाटे , पञकार,संदीप ढोरे, पञकार गजानन सरकटे, पञकार राजेश मगर यासह अनेक पत्रकार बांधवांनी राऊत कुटुंबियांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन त्यांचे सांत्वन केले, खरतर शांताबाई राऊत यांनी आयुष्यासाठी स्वतः निरक्षर असतानासुद्धा मुलांना उच्चशिक्षित करूर त्यांच्या वर सुसंस्कार केले ,कुटुंब सांभाळत असतांनाच शेती प्रती एकनिष्ठ असलेल्या शांताबाई राऊत यांचे दुःखद निधन झाले त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम हा दिनांक 11 मे 2022 वार बुधवार रोजी सकाळी ९ वाजता स्मशानभूमी, देऊळगाव माळी ता. मेहकर जिल्हा बुलढाणा येथे होणार असून याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे परिवाराच्या वतीने करण्यात आले, सर्व मित्रमंडळींना नोंद घ्यावी



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



