युवा स्वाभिमान पार्टी कडून वरवर बकाल ग्रामपंचायतला निवेदन
संग्रामपूर तालुक्यामधील संग्रामपुर तालुका अध्यक्ष रवी देवराव सोळंके यांनी काही दिवसा अगोदर ग्रामपंचायत कार्यालय वरवट बकाल येथे माहितीचा अधिकार टाकला होता त्यामध्ये ग्रामसेवक बोडखे यांनी स्वतःच्या लेखी मध्ये रवी सोळंके यांना लेखी दिली .
त्यामुळे युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका अध्यक्ष यांनी दिनांक 4 मार्च 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये निवेदन सादर केले आहे त्या निवेदन मध्ये नमूद आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार ग्रामपंचायत मार्फत डजबीन एक लाख 13 हजार 250 रुपये आणि कचरा गोळा करण्याचे साधन तीन” चाकी सायकल रिक्षा 27 हजार रुपये विशेष सायकल रिक्षा ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये धूळखात उभीच आहे तसेच कचरा टाक्याचे डजवीन हे सुद्धा वरवट बस स्टॅड वर कुठेच दिसत नाही आहे .त्यामुळे तालुका अध्यक्ष रवी सोळंके यांना ग्रामसेवक यांनी लेखी माहिती दिल्यावर युवा स्वाभिमान पार्टीची तालुका अध्यक्ष त्यांनी यां निवेदनामंध्ये म्हटले आहे की मला लेखी स्वरूपात जी माहिती अधिकार मधील मिळाली.
त्या कामाची संपूर्ण बिले सुद्धा मिळाले पाहिजे आणि ग्रामपंचायत अंतर्गत कम्प्युटर प्रिंट आणि झालेल्या संपूर्ण मागील एक दोन वर्षापासून कामाचे ठराव सुद्धामिळाले पाहिजे आणि अहवाल सुद्धा मला द्यावेत या सर्व कामांची बिल पंधरा दिवसाच्या आत देण्यात यावी
अन्यथा मी वरवट बकाल येथे लोकशाही मार्गाने ग्रामपंचायत अंतर्गत वरवट बकाल चौकामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणार अशा प्रकारचा इशारा निवेदनां मार्फत ग्रामपंचायत वरवट बकाल यांना युवा स्वाभिमानी पार्टीचे रवी सोळंके यांनी दिले आहे .