मा.आ.बच्चू कडू यांचा सामाजिक दायित्वाचा वारसा जपत एक दिवा दुरितांसाठी उपक्रम साजरा:

 

प्रतिनिधी:(धाराशिव)आमचे प्रेरणास्थान मा.आ.बच्चुभाऊ कडू यांच्या आचार -विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या वैचारिक -सामाजिक संकल्पनेतून दुरितांचे तिमिर जावो या ज्ञानेश्वर महाराजांच्या श्लोकानुसार समाजातील दुरित गरजवंत दिव्यांग,ऊस तोड कामगार,अनाथ तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबात दिवाळीचा आनंद प्रकाश पोहचवण्यासाठी श्री.संतोष राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनाव्दारे एक दिवा दुरितांसाठी उपक्रम राबवण्यात येत आहे.
प्रहार शिक्षक शिक्षकेतर संघटना उस्मनाबाद(धाराशिव)येथे गोरगरीब,गरजू,निराधार,विधवा महिला यांना किराणा मालाचे किट्स वाटप करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.वैजीनाथ सावंत,जिल्हा कोषाध्यक्ष श्री.रघुनाथ दैन,तालुका उपाध्यक्ष श्री.शहाजी झगडे,तालुका नेते श्री.लक्ष्मण औताडे,तालुका संघटक श्री.सुबराव सुरवसे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमात योगदानाबद्ल श्री.वैजिनाथ सावंत व त्यांच्या पदाधिका-यांचे प्रहार संघटनेतर्फे खुप खुप आभार व धन्यवाद.

Leave a Comment