Home कृषिसंपदा मृग बहार न बहरल्याने संत्रा उत्पादकांची दिवाळी अंधारात

मृग बहार न बहरल्याने संत्रा उत्पादकांची दिवाळी अंधारात

380
0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव व जामोद या परिसरातील यावर्षी संत्र्यावर मृग बहार येईल व यातून चांगले पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांची
अपेक्षा होती. परंतु ही आशा निसगार्ने फोल ठरवली. मृग नक्षत्रात पाऊस, कधी ऊन तर कधी ढगाळ हवामान
तसेच सतत पावसाची रिमझिम सुरू नसल्यामुळे या बदलत्या आणि प्रतिकूल हवामानाचा फटका संत्राच्या
बागेला बसला असून पूर्ण हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे संत्रा बागा न बहरल्याने काहीच उत्पादन झाले नाही.
त्यातच शासनाकडून परंतु जामोद मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा पीकविमा मिळाला नाही त्यातच दिवाळीपूर्वी शासनाची मदतीची आशा होती ती सुध्दा फोल ठरली. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकयाची
दिवाळी अंधारात जाण्याच चिन्हे दिसू लागली आहेत. पारंपरिक पिकाला फाटा देत अनेक शेतकरी फळबागाकडे
वळले आहेत. त्यामुळे तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील वर्षी कवडीमोल
भावाने संत्र्याची विक्री करावी लागली तर तर यावर्षी बहर न आल्याने संत्रा बागा फुटल्याच नाही.

Previous articleशेतकऱ्यांच्या मांगण्यासाठी स्वाभिमानी चे खातखेळ ग्रापंपचायत समोर धरणे आंदोलन 
Next articleसूनगाव परिसरात बी टी कापसावर बोंड अळीचे थैमान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here