SURYA MARATHI NEWS
अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक ) सह निलेश चिपडे
पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने वृक्ष लावा वृक्ष जगवा असे म्हटले जाते त्याकरता लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली आहे व केल्या जात आहे. तर दुसऱ्या बाजूने मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असून स्वतःचे चांगले करीत असल्याची चर्चा आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत आर.एफ.ओ. दादगाव बिट जमदार– यांच्या कृपा आशीर्वादाने नांदुरा -चांदूर बिस्वा रोडवर व काही भागात दररोज मोठ्या प्रमाणात तीही मोठ मोठ्या वृक्षांची व कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या खुलेआम वृक्षतोड सुरू आहे.यावर कोणताही कारवाई नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मोताळा, नांदुरा, तालुक्यातील व इतर आरा मशीन वर जाऊन धाड टाकून पाहणी केली तर हजारो घनफूट लाकूड साठा मिळून येईल. त्याकरता संबंधित विभागाने यावर कारवाई करणे आवश्यक आहे असे जनतेतून बोलल्या जात आहे.



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



