मोहाडी येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा तालुक्यातील मोहाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे त्यांची जयंती दि १२ जानेवारी ला आज उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण मोहाडीच्या कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर ग्रामसेविका सौ कल्पना बोरुडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल ऋषिकेश रिंढे यांनी राजमाता जिजाऊ आउसाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या स्वराज्य घडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेल्या अमूल्य कार्याचे वर्णन केले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाचनालयाचे अध्यक्ष कैलास रिंढे यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच अशोक रिंढे व जिल्हा महासचिव संदीप इंगळे, परमेश्वर रिंढे आदी हजर होते.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त स्पर्धा परीक्षेची आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी 50 विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदवला होता. 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . या परीक्षेत एकूण 7 पारितोषिक ठेवण्यात आले होते.
यांमध्ये विवेक इंगळे, सतीश काळे, अजय इंगळे, हर्षल सुखदाने, प्रमोद इंगळे, कु. रोशनी मापारी, कु. साक्षी काळे आदी गुणवंतांना उपस्थितांकडून पारितोषिक वितरण करण्यात आले . यावेळी वाचनालय सचिवा मालता रिंढे ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई इंगळे, रमेश रिंढे, प्रतीक रिंढे, अशोक रिंढे, तात्या गाडगे सर, संदीप रिंढे व सर्व स्पर्धक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी ग्रंथपाल ऋषिकेश रिंढे यांनी सर्वाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Comment