अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती वाहतूक,सुरूच. वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष .

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती वाहतूक सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे ,तसेच नदी नाल्यातील रस्ते खराब होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी नेणे सुद्धा मुश्कील झाले आहे. न्यायालयाने रेती उत्खनावर कठोर निर्बंध लादले आहेत मात्र न्याायालयाने दिलेल्या आदेशाला महसुल विभागा कडून केराची टोपली दाखविली जाते, संग्रामपूर तालुक्यातील टूनकी,काकनवाडा, वरवट बकाल,काटेल कोलद सह अनेक ठिकाणी, मनमानी पद्धतीने रेती उपसल्या जात आहे, यावर फार मोठी कारवाई होताना दिसत नाही, दरवर्षी कोटी रुपयांची रेती तस्करी करणाऱ्या वाहनावर तथा रेती साठा यावर कारवाई करण्यात आली होती ,पण आज मात्र तशी कार्यवाही होताना दिसत नाही,याचे कारण काय तर पाणी कुठी मुरत तर नाही ना? अशी जनते मध्ये चर्चा जोर धरत आहे या कार्यवाहीचाचा आकडा सबंधित प्रशासनाकडून दाखवत स्वतःच्या पाठीवर शाबासकी ची थाप मारून घेण्यात प्रशासन मश्गुल असल्याचे बोलले जात आहे,अनेकदा पर्यावरण प्रेमी व समाज सेवकांनी साठा पकडून व वृत्तपत्र ईले. व सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या प्रसारित करूनही स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी व प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे, असे नागरिकात चर्चेला उधाण

Leave a Comment