( प्रतिनिधी)विकी वानखेडे
. येथील यावल चोपडा मार्गावरील रस्त्यावर फॉरेस्ट कार्यालया जवळ आज दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन दुचाकी मोटर वाहनांचा अपघात होवुन यात चार जण जखमी झाल्याची घटना घडली असुन , यातील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असुन दोन जणांना प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे वृत आहे . या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की सावदा तालुका रावेर येथील राहणारे संतोष किसन भोई वय ३० वर्ष आणी भुसावळ येथील राहणाऱ्या आशा विनोद भोई वय २५ वर्ष हे त्यांच्याकडील मोटरसायकल क्रमांक एमएच १९डीडी ५८६२या वाहनाने सावदाहुन तोरखेडा तालुका शहादा येथे बहीणीकडे जाण्यास निघाले असतांना यावल चोपडा मार्गावर शहरापासुन सुमारे १ किलोमिटर लांबी असलेल्या फॉरेस्ट कार्यालयाच्या परिसरा जवळील रस्त्यावर चोपडया हुन यावल कडे येणाऱ्या मोटर सायकलने समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष भोई आणी आशा भोई व अन्य दोन जंण असे चार जण जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे . यातील दोन गंभीर जख्मींना ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार केल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव पाठवण्यात आले असुन , घटनेच्या ठीकाणी पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यास पहोचल्याचे वत्त आहे. अपघातातील जख्मीना मदतीसाठी रिपाईचे कार्यकर्त विष्णु पारधे, यावल येथिल भोई समाजाचे कार्यकर्त भिका भोई व अन्य सामाजीक कार्यकर्त्यांनी मदत केली .दरम्यान यावल चोपडा मार्गावरील रस्त्याची अवस्थाही अत्यंत दयानिय झाली असुन , या मार्गावर वारंवार अपघात होत असुन देखील यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचुकार कारभाराऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यावर ही याची साधी दखल घेतली जात नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागा कार्यपद्धती बाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे .