Home Breaking News यावल बुरूज चौक ते शासकीय गोदाम पर्यंतच्या रस्त्याचे काम सात महीन्यांपासुन प्रलंबीत

यावल बुरूज चौक ते शासकीय गोदाम पर्यंतच्या रस्त्याचे काम सात महीन्यांपासुन प्रलंबीत

302
0

 

 

सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावेयावल येथील बुरूज चौक ते सातोद मार्गावरील शासकीय गोदाम पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मागील सात महीन्यांपासुन प्रलंबीत असल्याने वाहनधारका व पादचाऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागत आहे . यावल शहरातील बुरूज चौक ते सातोद कोळवद या मार्गावरील रस्त्यावरील पोलीस स्टेशन , ग्रामीण रुग्णालय , स्टेट बॅकेचे मुख्य कार्यालय , तहसील कार्यालय , विविध शाळा आदी मुख्य कार्यालय असुन या मार्गावर कार्यालयाशी निगडीत कामा करीता येणाऱ्या नागरीकांची नियमीत मोठी वर्दळ असते हा विषय लक्षात घेत शासनाच्या वतीने सुमारे ५०० मिटर पर्यंतचा रस्त्यासाठी निधी मंजुर झाला असुन या कामास सर्वमान्यता मिळाली असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग यावल च्या अक्षमय: दुर्लक्षामुळे मागील सात महीन्यांपासुन सुरू न झाल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारका पासुन तर पादचाऱ्यांना रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने व त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजुस कामाची खड्डीअनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या प्रलंबीत कामास सुरूवात करून त्वरीत पुर्णत्वास घेवुन जावे अशी मागणी नागरिक करीत आहे .

Previous articleचंद्रपुर भाजपचे डिजिटल सदस्य नोंदणी पर्व सुरू !!
Next articleखोपटा ते कोप्रोली चौक रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here