राज्यस्तरीय सेस्टोबॉल स्पर्धेत अकोला जिल्हासंघाला दृतीय स्थान प्राप्त

 

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

विदर्भराज्यस्तरीय सेस्टो्बॉल असोसिएशन व नागपूर जिल्हा सेस्टोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सेस्टो्बॉल स्पर्धा दिनांक २४ ते २६ डिसेंबर २०२३ दरम्यान नागपूर येथे पार पडल्या सदर स्पर्धेत अकोला जिल्हातील खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन करीत राज्यस्तरावर दृतीय स्थान प्राप्त केले आहे.

संघात पुढील खेळाडूंचा सहभाग होता प्रतीक साबळे (कर्णधार),ओम कनोजे,(उपकर्णधार)अक्षय मोर,राहुल चावरे,अमरदीप मोहोड,धीरज फुके,अभय इंगले,गौरव गवाई,शेख रेहान,शेख हादिन,सुजल चौहान,हर्षल चौहान,शाहिद खान,प्रेम मोहोड,कारण प्रजापति,देवा मिलांदे विजयी संघाला अकोला जिल्हा सेस्टो्बॉल असोसिएशन चे सचिव विवेक भागवत यांचे मार्गदर्शन लाभले,

अकोला जिल्हा सेस्टोबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संजय इसाळकर,उपाध्यक्ष अजिंक्य तिडके,कोषाध्यक्ष अजितसिंग सौदी, युनिटी स्पोर्ट्स अकॅडमि चे अध्यक्ष संदीप जळमकर, मंगेश पवार, अंकुश मोरिया यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment