राम का नाम जपणा और माल अंदर करना

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- आई उर्फ माता मंदिर देवस्थाना व हिंगणघाट येथील श्रीराम देवस्थान करीता सुविधायुक्त सभागृह, मंदिरा समोरील सिमेंट रस्ता, विद्यार्थ्यांकरीता लायब्ररी इत्यादी कामांकरीता मंदिराच्या विश्वस्त मंडळा कडून निवेदन प्राप्त झाल्याने जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत तिर्थक्षेत्र विकास योजने मधुन देवस्थानाला निधी उपलब्ध करुन दिला.
हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील माता मंदिर वार्ड येथील आई उर्फ माता मंदिर देवस्थान व श्रीराम मंदिर देवस्थान राम मंदिर वार्ड हिंगणघाट शहरातील प्रसिध्द देवस्थान असून नवरात्रीच्या वेळेस संपूर्ण शहरातील नागरीक तसेच आजू बाजूच्या परिसरातील नागरीक दर्शना करीता लाखोच्या संख्येने उपस्थित होतात. तसेच मंदिरा मध्ये वर्षभर विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम पार पडतात. आई उर्फ माता मंदिर देवस्थान व श्रीराम मंदिर देवस्थानास आवश्यक मुलभुत सुविधा उपलब्ध झाल्या .
यापैकी किती सुविधा जनतेला मिळाल्या हिंगणघाट शहरात अनेक प्रभागात अनेक योजनेतून अर्धवट कामे झालेली आहे . याला सर्व जबाबदार आहे लोकप्रतिनिधी. प्रभागात अवैध धंदे बंद करण्यासाठी चांगले प्रतिनिधी निवडून आणणे जनतेचे कर्तव्य आहे नाहीतर अच्छे दिन आयेंगे हे स्वप्न राहिल .

Leave a Comment