Home वर्धा Tukarammundhe/”कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे यंत्रणा सक्रिय; चांगले अधिकारी प्रत्येक विभागात आवश्यक”

Tukarammundhe/”कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे यंत्रणा सक्रिय; चांगले अधिकारी प्रत्येक विभागात आवश्यक”

0
2

 

वर्धा प्रतिनिधी : सचिन वाघे

Tukarammundhe/राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा, पानमसाला आणि भेसळीविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त होत आहे की, अधिकारी सक्षम व प्रामाणिक असेल तर संपूर्ण यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत होते.

वर्धा जिल्ह्यातही यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या कार्यकाळात अवैध दारू व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्या काळात अनेक ठिकाणी अवैध व्यवसायांना आळा बसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा काही भागांमध्ये अवैध व्यवसाय वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ कारवाई नव्हे, तर सातत्यपूर्ण आणि प्रभावी नेतृत्व आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे

पोलीस, महसूल, अन्न व औषध प्रशासन यांसारख्या विविध विभागांमध्ये कर्तव्यदक्ष आणि निर्भीड अधिकारी कार्यरत असल्यास शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होऊ शकतो.

Tukarammundhe /दरम्यान, अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी सातत्याने तपासणी मोहीम राबवावी आणि नागरिकांनीही बेकायदेशीर प्रकारांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here