राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी युवा शेतकरी ज्ञानेश्वर ताकोते यांची नियुक्ती….

 

विठ्ठल अवताडे  शेगाव

दि.12 जानेवारी 2023 रोजी विमलाबाई देशमुख सभागृह, धनवटे कॉलेज नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली.

या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा साबळे यांनी शेगाव निवासी युवा शेतकरी ज्ञानेश्वर ताकोते यांची नियुक्ती केली. सदर नियुक्तीपत्र श्री ज्ञानेश्वर ताकोते यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ. बबनराव तायवाडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस मा. सचिन राजूरकर, राष्ट्रीय सहसचिव शरद वानखडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य अध्यक्ष मा.प्रकाश भोगरथ तथा माजी आमदार मा.दिगंबर विशे उपस्थित होते.

Leave a Comment