रेती ट्रॅक्टर मालकाच्या निवेदनावरून अवैद्य धंद्याची केली पोलखोल ! अवि नवरखेले

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट शहरात ट्रॅक्टर चालक मालकांनी कधीही निवेदन दिले नाही व येथील आमदाराशी व कलेक्टर तहसीलदार यांच्याशी कधीही चर्चा केली नाही.आता स्पष्ट मी सांगते की हे कशासाठी आहे कारण आत्ता संदीप सूरकार त्याच्या वर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे .तो बीजेपी कार्यकर्ता व त्याच्या घरी त्याची वहिनी ही BJP नगरसेविका आहे. याच्या अगोदर टिप्पर मालक ज्यांनी आपल्या परिवारासोबत आमरण उपोषण केले होते त्यालाही ट्रॅक्टर चालक मालकांनी कधीही प्रतिसाद दिला नाही व त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या उपोषणाला सहभागी झाले नाही, आज हे कशासाठी आहे ?
याच्या पूर्वी अनेक ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे. ट्रॅक्टर चालक मालक यांच्यावर कित्येक वेळा 379 चोरीच्या गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हा कुणी आवाज उचललेला नाही. आता सर्व काही मा.पोलीस अधीक्षक नुरुल हसन आले आहे. जे या रेती व्यवसायात आहे ,यांचे 2 नंबर चे कामे पूर्णपणे बंद पडल्यामुळे पोट कस भरणार कारण रेती व्यवसाय मागे हे रात्र दिवस शहरातल्या प्रत्येक ठिकाणी चौकात उभे राहून प्रत्येक शासन – प्रशासन सर्व पदाधिकारी कर्मचारी यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत होते व यांचे पूर्ण जे काही 2 नंबरचे व्यवसाय राहते ते पूर्ण होत होते आता यांचे काम पूर्ण होऊन राहिले नाही म्हणून आता इतके भाबावले आहे .यात काही आपल्या शरीरावर खादी वस्त्र व वाईट शर्ट घालून , पत्रकार आहे . हे सर्व ह्या शहरात होणारे प्रत्येक 2 नंबरच्या कामात सहभागी आहे. प्रत्येक नागरिकाला हे समजणे गरजेचे आहे की शहरात 2 नंबरच्या व्यवसाय हा सुरू करण्यासाठी सर्वात अगोदर रेती व्यवसाय हा सुरू करावा लागतो नंतर हायवेवर अवैद्य कोळसा, धान्य ,मास व इतर अवैध व्यवसाय या सर्व गोष्टी हे सर्वे राजकारणी व पत्रकार असलेले या सर्व बाबीवर लक्ष ठेवून चालणारे लोक आहे . हे सर्वात अगोदर व्यवसाय सुरू करत असतात त्यानंतर शहराच्या आत होणाऱ्या 2 नंबरच्या कामाला सुरू करण्याची परवानगी मिळते म्हणून या सर्वांवर व विशेष लक्ष देणे सुरू आहे कारण यांना रात्रीला फिराची परवानगी नाही व यांचे 2 नंबरची कोणतीही कामे पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे हे रस्त्यावर निघाले आहे. रेती व्यवसाय मुळात ज्याच्या रक्तात व ओरिजनल चोर आहे असं मी समजतो कारण हा व्यवसाय कित्येक वर्षापासून यांच्या बापाच्या असल्यासारखा आहे कारण नवीन ट्रॅक्टर नवीन लोक ह्या रेती धंद्यामध्ये आले तर ह्या लोकांनी कधीही त्यांना टिकू दिले नाही.

Leave a Comment