लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मध्ये झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान rain 

 

लोकप्रतिनीधी ना पडला शेतक-यांचा विसर शेतक-यांच्या बांधावर जाण्यास त्यांना वेळ नाही

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

तालुक्यातील लाखपुरी सह लाखपुरी सर्कल अनेक भागात अवकाळी पाऊसामुळे दि.२७,२८,२९,३० रोजी झालेल्या पाऊसामुळे कापुस,हरभरा,तुर,कांदा,गहु पिकांचे मोठ्याप्रमाणात अतोनात नुकसाना झाले.हजारो हेक्टर शेतीच्या पिकांचे नुकसान झाले.लाखपुरी व लाखपुरी सर्कल मधील अनेक ठिकाणी घरांचे सुध्दा पडझड झाली आहे.लाखपुरी शिवारातील काही शेतातील कापुस तर अक्षरशा खाली पडला तर काही तुरीचे पिकांचे अतोनात नुकसान झाले काही हरभरा पिक सडण्याच्या मार्गावर आहे,

व ईतरही पिकांचे नुकसान झाल्याची परिस्थीती आहे.शेतक-यावर असे असमानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.या अवकाळी पाऊसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.गेल्या ३ ते ४ दिवसापासुन सतत सुरु असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले.व शेतक-यावर कर्ज बाजारी होण्याची वेळ लाखपुरी सर्कल मधील शेतक-यावर आली आहे.अवकाळी पाऊसामुळे लाखपुरी,रसुलपुर,रेपाटखेड,खुदावंतपुर, दातवी,दुर्गवाडा,सांगवी,वाघझडी,मंगरुळकांबे,जांभा,लाईत व इतर गावाचा समावेश आहे.

शासनाने सदर झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्याकरिता महसुल विभागाला व कृषी विभागाला तातडीने सर्वे करण्याचे आदेश देवुन शेतक-यांला तातडीने आर्थिक मदत द्यावी व अशी मागणी लाखपुरी च्या माजी पं.स.सदस्या मिनल नवघरे सह लाखपुरी सर्कलच्या शेतक-यांनी केली आहे .

________________________________________

लाखपुरी सर्कल मधील लाखपुरी,मंगरुळकांबे,जांभा,रसुलपुर,
खुदवंतपुर,रेपाटखेड,दातवी,लाईत, दुर्गवाडा,सांगवी,वाघझडी व इतर ठिकाणी दि.२७,२८,२९ रोजी अवकाळी पाऊसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. व शेतकरी संकटात सापडला आहे.तरी महसुल विभागाने व कृषी विभागाने तातडीने सर्वे करुन झालेल्या नुकसानाची भरपाई शेतक-यांना द्यावी.

मिनल नवघरे
(माजी पं.स.सदस्या लाखपुरी)
_______________________________________
तालुक्यातुन आलेल्या तक्रारी मंडळ अधिकारी यांना पाठविल्या आहे.सदर मंडळ अधिकारी त्या शेताची नुकसानी संबधी पाहणी करणार आहेत.

उमेश बनसोड
(नायब तहसिलदार मुर्तिजापुर)

_________________________________________

लाखपुरी व खुंदावतपुर ईतर परिसरात खुप मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतक-यांचे नुकसान खुप मोठ्या प्रमाणात झाले असुन शेतक-यांना मदत द्यावी.

गजानन गवई
(शेतकरी खुंदावतपुर)

_________________________________________
माझे शेत मंगरुळकांबे शिवारात असुन १५ एक्कर मध्ये मी कपासी पेरली असुन यामध्ये दि.२७,२८,२९ रोजी आलेल्या अवकाळी पाऊसामुळे १५ किंटल कापसाचे माझे नुकसान झाले.अक्षरशा कापुस गळुन खाली पडत आहे.शासनाने सर्वे करुन आम्हाला मदत करावी.
ऋषिकेश डिके
(शेतकरी मंगरुळकांबे)

Leave a Comment