लोकांचे व पर्यटकांचे मन आकर्षित करणारे निंबादेवी धरण झाले ओव्हरफ्लो पर्यटकाना प्रवेश बंदी

 

यावल ( प्रतिनिधी )विकीवानखेडे

यावल तालुक्यातील व सातपुडा पर्वतातील निंबादेवी धरणात पाण्याचा साठा चांगलाच वाढलेला आहे. सध्या पर्वतात दररोज चांगल्या प्रमाणात पाऊस होत असल्याने धरण तुडूंब भरले आहे. गेल्या वर्षी हे धरण २३ जुलै रोजी भरले होते. सदर ठिकाण अतिशय विलोभनिय असल्याने गेल्या वर्षी निसर्ग प्रेमींनी चांगलीच गर्दी केली होती.

अनेक दिवसांपासुन जिल्ह्यातील लाखो पर्यटक हे या आकर्षणाचे केन्द्र असलेल्या धरणाच्या ओव्हरफ्लोच्या प्रतिक्षेत होते. मागील दोन तीन वर्षांपूर्वी कोरोना प्रार्दुभावच्या काळात या धरणावर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. त्यावेळीपासून यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहे.

भुशी डॅमची अनुभुती पर्यटकांना याठिकाणी गेल्यावर येते असे पर्यटकांचे म्हणणे आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हे धरणावर यावल, फैजपुर, रावेर, भुसावळ जळगाव धुळे शहरासह विविध ठीकाणाहुन शहरी जिवनातील गर्दीतुन बाहेर पडण्यासाठी आणी निसर्गाशी जोडण्यासाठी ही एक संधी असल्याचे समजुन

मोठमोठी डोंगरातुन नैसर्गीक हिरवगार झाडे व नयनरम्य पर्वतास बघण्यासाठी सहलीच्या निमित्ताने बघणाऱ्या पर्यटकांची या ठीकाणी गर्दी होत असते एक निसर्गरम्य ठिकाण म्हणुन या डॅमची गणना केली जात आहे. मागील घटनांच्या पार्श्वभुमीवर याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते त्यासाठी काही अप्रीय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने निंबादेवीचे पर्यटनस्थळ पर्यटकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन धरणाच्या ठीकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफळे, पोलीस कर्मचारी आणी गृहरक्षकदलाचे महीला व पुरुष कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांनी याठिकाणी येवु नये असे आवाहन पोलिसानी केले आहे.

Leave a Comment