Home Breaking News वाघाने घेतला बोकडाचा बळी

वाघाने घेतला बोकडाचा बळी

266
0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

अर्जूनी/,मोर,दि.21ः-अर्जुनी-मोर वन विभागांतर्गत येणाऱ्या बोंडगाव देवी परिसरात वाघाची दहशत पसरली असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .20 आँक्टोंबरच्या रात्री 11:30वाजता बोडंगाव देवी येथील यशवंत नेवारे यांच्या गोठ्यात शिरुन वाघाने बाधंलेल्या बोकडाला फस्त केल्याची घटना घडली. यशवंत नेवारे यांना जाग आल्याने त्यांनी वाघाला बघताच आरडाओरड केली असता परिसरातील नागरिक एकत्र येऊन ओरडू लागल्याने तिथून वाघाने पळ काढला.दोन दिवसाआधी रामकृष्ण झोळे यांच्या घरातील कोंबड्या वाघाने फस्त केल्या.गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात वाघाची दहशत पसरली असून वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नेवारे यांच्या गोठ्यात बांधलेला बोकडाला वाघाने फस्त केल्याने वन अधिकाऱ्यांना माहिती देत आर्थिक नुकसान झाल्याने भरपाईची मागणी केली आहे. ज्या ज्या कुटुंबातील वाघाने कोंबड्या बकऱ्यांची नुकसान केली अशा सर्व कुटुंबांना वन विभागाकडून मदत द्यावी व दहशत असलेल्या वाघाचा पकडून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी बोंडगाव देवी सर्व परिसरातील जनतेने केली आहे.

Previous articleसावता परिषद कडून नवनिर्वाचित तहसीलदार यांचा सत्कार
Next articleगेवराई शेमी येथे वीज कोसळून बैलजोडी ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here