विधवा महिलांना आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत चेक चे आ.डॉ. संजय कुटे यांच्याहस्ते करण्यात आले वाटप…

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगांव जामोद तहसील कार्यालयात आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दारिद्रय रेषेखालील आर्थिक दुरबल कुटुंबातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून 20 हजाराचे चेक जळगांव जामोद तहसील मधील हॉटेलमध्ये वाटप करण्यात आले.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत कुटुंब प्रमुखाचा नैसर्गिक मृत्यू झालेल्या विधवा महिलांना आमदार डॉ. संजय कुटे यांचे हस्ते 20 हजाराचे चेक वाटप करण्यात आले. जळगांव जामोद तालुक्यातील 21 दुर्बल घटक तसेच दारिद्रय रेषेखालील विधवां महिलांना प्रत्येकी वीस हजार या प्रमाणे मदत शासनातर्फे देण्यात आली.यावेळी माजी कामगार मंत्री आ. डॉ. संजय कुटे, उपविभागीय अधिकारी सौ. वैशाली देवकर, तहसीलदार शिवाजीराव मगर, नि. नायब तहसीलदार खाडे,सौ. बंगाले, वडोदे, भारंबे, यांचे सह तहसील चे अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Comment