विनापरवाना अवैद्य वाळुची वाहतुक करणारा महसुलने जप्त केलेला डंपर चोरून नेले गुन्हा दाखल

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथे शहरात विनापरवाना वाळू वाहतूक करणारे डंपर येथील महसूल विभागाने जप्त केले होते. ते डंपर आज पहाटे तीन च्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येथील पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

येथे शहरात डंपर क्रमांक (एमएच १९ -८६५६) या डंपर मधून वाळू वाहतूक करीत असताना येथील महसूल विभागाच्या पथकाने सदर वाहन जप्त करून, तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. गुरुवार (ता.१३) पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान गणेश गंगाराम कोळी ( रा. ममुराबाद), संदीप आधार सोळंके (रा. कोळन्हावी ता.यावल) यांच्यासह इतर दोघांनी तहसील कार्यालयाच्या आवाराचे बंद गेट तोडून आत प्रवेश करत सहा लाख रुपये किमतीचे वाळूचे डंपर चोरून नेले. अशा आशयाची फिर्याद तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अधिकारी दीपक बाविस्कर यांनी येथील पोलिसात दिली आहे. संशयित गणेश कोळी, संदीप सोळुंके यांचे सह इतर दोन असे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर या करीत आहेत.

Leave a Comment