सन्माननीय मुख्य मंत्री यांची शाहिरी कलावंतांनी घेतली अभिनंदनीय भेट:

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(मुंबई)आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची नियोजित भेट मीटिंग ठाणे येथील टेंभी नाका कार्यालयात आपल्या शिष्ट मंडळातील सदस्य यांनी घेतली.विशेष म्हणजे आपल्या राज्यातील रजिस्टर लोक,कलावंत संस्था व लोककलावंत यांच्या व्यथा आणि सध्य परिस्थिती त्यांना समजाऊन सांगितली.आणि त्यांनी ते आत्मीयतेने ऐकून घेतले.तसेच मुख्यमंत्री मनाने की मी सविस्तर निवेदन स्वीकारून मी शासकीय जनजागृती करणाऱ्या तुम्हां सर्व लोक कलावंतांचा आदर करतो.तुमची जनजागृतीची कामे लवकरच चालु होतील असे आश्वासन देतो असे सांगीतले.सदर निवेदन देण्यासाठी आपल्या शिष्ट मंडळातील सदस्य शाहीर मालुसकर पुणे,शाहीर सुभाष गोरे सोलापूर,सत्यभामा आवळे पुणे,शाहीर उत्तम गायकर नाशिक,शाहीर बाबू राठोड जालना आणि ही भेट घडवून देण्यासाठी कष्ट घेणारे शाहीर गोरे यांचे परम मित्र गुरुनाथ दळवी ठाणे यांचा सक्रीय सहभाग अत्यंत मोलाचे ठरले.

Leave a Comment