Home Breaking News शिंदी येथे शेतातून ठिबक सिंचनचे ३५ हजार किंमतीचे 11 बंडल चोरीला !

शिंदी येथे शेतातून ठिबक सिंचनचे ३५ हजार किंमतीचे 11 बंडल चोरीला !

347
0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

अगोदरच शेतकरी शेतातील विजेच्या समस्येमुळे त्रस्त आहेआणि शेतातील शेतीचे साहित्य चोरीला जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडला आहे ! शिंदी येथील प्रयोगशील शेतकरी विनोद खरात यांनी शेतामध्ये ठिबक करण्यासाठी दुकानातून नवीन ठिबक सिंचनचे 11 बंडल खरेदी केले होते त्याची किंमत 35000 रुपये होती !त्यांनी हे सर्व बंडल एका शेतातील झाडावरती ठेवून दिले होते .काही दिवसांनी शेतामध्ये ठिबक लावायचे असल्यामुळे त्यांनी ठेवलेले ठिबकचे बंडल बघितली असता त्या ठिकाणी ते आढळून आले नाहीत !शेजारीपाजारी सर्व ठिकाणी शोध घेतला असता कुठेही ठिबक चे बंडल आढळली नाही ‘शेवटी शोधाशोध झाल्यानंतर शेतकरी विनोद खरात यांनी ठिबक ची बंडल चोरीला गेल्याची साखरखेर्डा पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दि . १० जानेवारीला दिली !यावेळी पोलीस कॉन्स्टेबल श्री चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला !शेतातील साहित्य चोरीला जात असल्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे ।पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री चव्हाण करत आहे !

Previous articleसिंदखेडराजा तालुक्यातील 39ग्रामपंचायत साठी मतदान !साखरखेर्डा येथे चुरशीची लढत !
Next articleमाजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी समाज भूषण अर्जुन गवई यांची निवड !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here