शिक्षक व ग्रामसेवक रहिवास बाबत खोटे दस्तावेज सादर केल्याप्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी उपोषण सुरू..

गजानन सोनटक्के

जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शिक्षक व ग्रामसेवक मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहतात मात्र मुख्यालय रहिवाशी चे खोटे दस्तावेज पंचायत समितीला सादर केले आहे त्यामुळे सचिव शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक व सरपंच यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अर्जुन दामोदर सपकाळ यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद कार्यालयासमोर दिनांक 14 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे अर्जुन सपकाळ यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शिक्षक व ग्रामसेवक मुख्यालयी न राहता गटविकास अधिकारी जळगाव जामोद व संग्रामपूर यांच्याकडे जुलै 2020 रोजी लेखी तक्रार केली आहे या प्रकरणात जळगाव जामोद येथील वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणाची थातुरमातुर चौकशी करून कर्तव्यात कसूर केला आहे संबंधितांवर कारवाई केली नाही वास्तविक पाहता जि.प.शिक्षक व ग्रामसेवक हे शहरी भागात राहत असून त्यांनी ग्रामपंचायत कडून खोटे रहिवासी दाखले व ठराव पंचायत समिती जळगाव जामोद ते सादर केले आहे याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कोणतीही चौकशी केली नाही या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा 14 सप्टेंबर पासून अधिकारी म्हणून काम करावे लागेल असा इशारा दिला होता त्यानुसार त्यांनी दिनांक 14 सप्टेंबर पासून उपोषणाला सुरुवात केली आहे….

Leave a Comment