सातळी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित व्हावे या मागणीसाठी सरपंच पतीचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सातळी गावाला जोडणाऱ्या या रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे तसेच गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नाली वरील पाईप फुटल्याने गावकऱ्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी दळणवळण कसे करावे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे सातळी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊनही आजपर्यंत ही या रस्त्याचे काम सुरळीत झालेले नाही त्यामुळेच सातळी गावचे सरपंच पती हे दिनांक 15 सप्टेंबर पासुन जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत जोपर्यंत रस्त्याचे काम सुरळीत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा हट्टच सातळी गावचे सरपंच पती यांनी धरलेला आहे तसेच उपोषण मंडपाला जळगाव जामोद नगरपरिषदेचे शिवसेना नगरसेवक रमेश भाऊ ताडे तसेच गाडेगावचे सरपंच रमेश नाईक यांनी सुद्धा भेट देऊन या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. तरी संबंधित विभागाने या सातळी गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Comment