(सूर्या मराठी न्यूज ब्यूरो)
यवतमाळ – यवतमाळ येथे आज विमा कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, विधानसभा प्रमुख संतोष ढवळे, महेश पवार यांच्यासह 9 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेमोसमी पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने अत्यल्प भरपाई दिली. लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांसह शिवसैनिकांनी स्टेट बॅंक चौकातील इफको टोकियो पीकविमा कंपनीवर मोर्चा काढला होता.
उर्वरित शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विम्याविषयी बातचीत करताना मॅनेजरने समाधानकारक उत्तर दिले नाही.
त्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या संतोष ढवळे यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले सोयाबीन कंपनीचे व्यवस्थापक सचिन सुरोशे यांच्या अंगावर फेकून त्यांना मारहाण केली. भावना गवळी यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.
त्याच प्रकरणावरून भावना गवळी यांच्यासह नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरकायद्याची मंडळी जमवणे, अंगावर जाणे, मारहाण करणे असे आरोप करण्यात आले आहेत. या मारहार मधे 9 जना विरुद्ध गुन्हा दाखल कण्यात आले आहे