आयुषी दुबे शेगाव
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे एकता ग्रुप शेगांव आणि आई जिजाऊ युवती दल शेगांव यांनी सामाजिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा केला. बुलढाण्यात कलम १४४ लागू झाले असून संचार बंदी सुरू आहे.तरी याची दाखल घेता शेगांव येथे महाराजांचा जयंती उत्सव हा साजरा करण्यात आला. समस्त एकता ग्रुप व आई जिजाऊ युवती दल यांनी तोंडाला मास्क, सोशल डिस्टंसिंग या गोष्टींची एकता ग्रुप अध्यक्ष खुशाल भाऊ सारवाण आणि आई जिजाऊ युवती दल अध्यक्ष आयुषी दुबे यांनी दक्षता घेऊन शेगांव येथे सई बाई मोटे सरकारी दवाखान्यात तसेच बस स्टँड, ऑटो स्टँड येथे बिस्कीट आणि फळांचे वाटप करून शिवरायांची जयंती साजरी केली,प्रत्येक नियमा पालन करून हे कार्य करण्यात आले.आजच्या काळात शिवाजी महाराज जयंती म्हटली की Dj ,band हे असतातच परंतु , एकता ग्रुप शेगांव यांनी असे काहीच न करता सामाजिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा केला आणि या कार्यात त्यांना
आई जिजाऊ युवती दल शेगांव यांनी सहकार्य केले. या कार्यातून एक शिकवण या मावळ्यांनी दिली आहे. ते म्हणजेच, महाराजांचे विचार त्यांनी याठिकाणी मांडले आहेत.



![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=218%2C150&ssl=1)



