शेगांव रेल्वे स्थानकाचा स्वछतेच्या बाबतीत आदर्श

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव : गत 10-12 दिवसांपासून शेगांव स्थानकाच्या बाबतीत दिवसेंदिवस सकारात्मक वाढ दिसून येत आहे. अधिक माहिती घेतली असता असे समजले की, सध्या केंद्र शासनाचा स्वतछता पंधरवडा चालू असल्याने अगोदरच साफ सफाई च्या बाबतीत अग्रेसर असलेले शेगांव स्थानक अधिकच खुलून दिसत आहे.

ह्यातही विशेष असे की शेगांव स्थानकाचे सर्व काम हे बिना कोणत्याही मशीन च्या सहाय्याने न होता 15 माणसांच्या गटाद्वारे केले जाते. शेगांव स्थानकाच्या फलाटावर मार्बल अथवा टाईल्स ई. नसतांना सुध्दा कोटा फरशी मध्ये वरील लाईट फेन ह्यांचे प्रतिबिंब दिसत असल्याचे पाहून सर्व प्रवासी व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. ह्या सर्व कार्यात प्रामुख्याने शेगांव स्थानकावरील स्वास्थ निरीक्षक लाभिनी किशोर पाटिल ह्यांचा सिंहाचा वाटा आहे असे समजले.

ह्यामध्ये त्यांना आर. पी. एफ. अधिकारी श्री. सिंह, श्री श्रीवास्तव, श्री रंजन तेलंग, श्री संजय पौंघांती मुख्य तिकीट निरिक्षक, श्री तडवी मुख्य बुकिंग पर्यवेक्षक तसेच आजारी असून सुध्दा परिवहन निरीक्षक श्री पुंडकर, ह्यांचे मोलाचे योगदान आहे.

Leave a Comment