शेतकऱ्यांना दिवसा कृषीपंपासाठी उच्च दाबाची वीज सकाळी पाच ते दुपारी १ आणि दुसऱ्या टप्प्यात दुपारी १ ते रात्री ९ या वेळेत मिळावी यासाठी सत्याग्रह शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, खामगाव. मौजे पळसखेड पिंपळे तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे आप्पासाहेब जाधव, रमेश जाधव, सुनील जाधव, या तीन सख्ख्या भावंडांचा रात्रीच्यावेळी पिकाला पाणी देत असताना शॉक लागून मृत्यू झाला. तसेच बिबट्याच्या हल्ल्यामुळे मौजे.सुरडी ता. आष्टी जि. बीड येथील नागनाथ गर्जे या शेतकऱ्याला जीव गमवावा लागला.. मौजे किन्ही ता. आष्टी. जि. बीड येथील १० वर्षीय स्वराज भापकर या लहान मुलाला अंगणात खेळत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गमवावा लागला औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील आपेगाव येथे ही माय बापावरही हेच वेळ आली. हीच वेळ बुलढाणा जिल्ह्यात येऊ नये या करिता वीज देण्यात यावी यासाठी सत्याग्रह शेतकरी संघटनेने आदरणीय कैलास भाऊ फाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना दिवसा उच्च दाबाची वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित खामगाव कार्यालय आपणास विनंती शेतकऱ्यांना वीज देण्यात यावी अन्यथा आम्हाला सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलन करावे लागेल. या वेळी अजून किती शेतकऱ्यांचे जीव घेतल्यानंतर विद्युत वितरण शेतकऱ्यांना दिवसाची वीज देईल…?? असा सवाल सत्याग्रह शेतकरी संघटनेने विचारला व बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सर्व गावच्या फिडरवर दिवसा वीज देण्यात यावी व विदर्भातील शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत गहू हरभरा अशा रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज देण्यात यावी. व आठ दिवसाच्या आत लाईन न मिळाल्यास पुन्हा एकदा अतिशय तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा सत्याग्रह विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष धीरज फाटे यांनी दिला.