शेतकऱ्याने फिरविला दहा एकरांतील उभ्या पिकामध्ये … ट्रॅक्टर -नरेश धूत

 

सोयाबीनच्या अर्ध्याधिक शेंगा पोकळ असल्याने खारपाण पट्ट्यातील सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे .

यंदा सोयाबीन सोंगणी आणि काढणीचा खर्च जड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत . संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथील शेतकऱ्याने दहा एकरातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला .

शेतकऱ्याने फिरविला दहा एकरांतील उभ्या पिकामध्ये … निरोड बाजार गावातील नरेश धूत यांनी आपल्या 333 गट नंबर मधील दहा एकरातील सोयाबीन ट्रॅक्टरने मोडले . यंदा सोयाबीन पेरणीपासूनच या पिकाला निसर्गाची नजर लागली . पावसाने नको त्यावेळी केलेला कहर खारपाण पट्ट्यातील सर्वच पिकांना मारक ठरला आहे . सोयाबीनचे पीक चांगले येईल या आशेने जिवापाड मेहनत करून उसनवारी , उधारी करून सोयाबीनची मशागत केली . शेंगा भरणीच्या वेळी निसर्गाने दगा दिला व एकदम वातावरणात बदल झाला . यामुळे सोयाबीनची उभी झाडे करपली . सोयाबीनच्या शेंगामध्ये भरलेले दाणे ज्वारीच्या आकाराचे भरले आहेत . सद्यस्थितीत सोयाबीन सोंगणीला आले आहे . एकरी अडीच ते तीन क्विंटलचा उतारा लागत आहे . मशागतीचा एकंदरीत खर्च जवळपास एकरी १५ हजार रुपये लागलेला आहे . उतारा लागत नसल्याने मळणी यंत्रधारकांनी एकरी हजार रुपयांचे दर काढले आहेत . सोंगणी , काढणी आणि आतापर्यंत झालेला खर्च पाहता उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन सोंगणी करावी की नाही , या मनस्थितीत या भागातील शेतकरी अडकला आहे .

Leave a Comment