शेतातील गोडाऊन मधून चाळीस हजार रुपये किमतीचे आठ पोते लंपास.. एका अनोळखी आरोपी सह चौघा विरुद्ध गुन्हा दाखल.

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: नागझरी रोडवरील सर्वे क्रमांक 1172/2अ संदीप काठोळे यांच्या मालकीच्या शेतातील गोडाऊन मधून आठ पोते सोयाबीन किंमत चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्या प्रकरणी 4 आरोपी विरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप पुष्पांकर गाठोडे व 48 वर्षे राहणार फुलेनगर शेगाव यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांच्या मालकीचे नागझरी रोडवर आहे.

या शेतामध्ये धान्य साठवणीसाठी गोडाऊन बांधण्यात आलेले असून या गोडाऊन लावलेले सलाखीचे लाॅक तोडून सुमित प्रकाश समदुर राहणार मिलिंद नगर तीन पुतळा परिसर शेगाव फाइटर उर्फ ऋतिक शिरूर कुंडवळा शेगाव सोपान बिलेवार राहणार टाकळी तालुका शेगाव अधिक एक अनोळखी अशा चौघ आरोपींनी या गोडाऊन मधून 12 सप्टेंबर रात्री नऊ ते 22 सप्टेंबरच्या रात्री पावणे नऊ वाजे दरम्यान आठ पोती सोयाबीन किंमत ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध कलम 380 46134 बादली चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बर्वे साहेब करीत आहेत

Leave a Comment