श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनी करण्यात आला पत्रकारांचा सत्कार…

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

सुनगाव येथील श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटर यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पत्रकार गजानन सोनटक्के पत्रकार अनिल भगत पत्रकार गजानन खिरोडकार पत्रकार शिवदास सोनोने या पत्रकार मंडळींचा पुष्पगुच्छ तसेच शाल डायरी व पेन देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य पती अशोक काळपांडे माजी सरपंच पुंडलिक पाटील यांचाही पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर शालिग्राम कपले यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच गावातील नागरिकांना वर्धापन दिनानिमित्त श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटर च्या वतीने मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच आजच्या या दिवशी श्रीराम रेडिमेट अंड क्लॉथ सेंटर ने ग्राहकांसाठी खरेदीवर विशेष धमाका ऑफर ठेवली होती यावेळी श्रीराम रेडिमेट अँड क्लॉथ सेंटरचे संचालक दिनेश मिसाळ यांनी गावातील नागरिकांसाठी चहा व फराळाची व्यवस्था केली होती तसेच या वर्धापन दिनानिमित्त दिनेश मिसाळ, पाडुरंग मिसाळ, राजेश मिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे, गुणवंराव कपले,माजी सरपंच पुंडलिक पाटील, शेषराव वंडाळे, डॉ. शालीग्राम कपले,गजानन धुळे, पवन पालीवाल,वासुदेव गायगोल,वनिता मिसाळ, अमोल धुळे,लक्ष्मण मिसाळ यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Comment