Home Breaking News समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना.छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद येथे भव्य रक्तदान...

समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना.छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद येथे भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन.

293
0

 

सागर जैवाळ फुलंब्री तालुका प्रतिनिधी

औरंगाबाद-आज दि.१४ ऑक्टोबर २०२० बुधवार रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या भव्य रक्तदान शिबीरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून या कोरोनाच्या काळात सामाजिक उपक्रमात मोलाचे योगदान दिले आहे.
या रक्तदान शिबीर निमित्ताने जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांनी मोलाची भूमिका घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रदेश प्रवक्ते प्रा. संतोष विरकर,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बनसोड,महानगरअध्यक्ष गजानन सोनवणे,कार्याध्यक्ष गणेश काळे,शहर संघटक योगेश हेकाडे, शहराध्यक्ष चंद्रकांत पेहरकर, शहर सचिव वामन भागवत, जिल्हा समन्वयक निशांत पवार,पैठण तालुकाध्यक्ष। देविदास सोनवणे, अनिल जाधव, लाला जाधव,युवक अध्यक्ष अजय भालेकर,अमोल तुपे,प्रकाश दिलवाले,सुनिल कातबने,औरंगाबाद तालुकाध्यक्ष अर्जुन गाडेकर,प्रसन्ना राऊत,मध्य शहराध्यक्ष चंदू नवपुते,राहुल निकम,बाळू सोनवणे, संजीवन घोडके,संतोष कुटे, विराज घोडके, किरण राऊत,माधव खलसे, संदीप पवार,आदिनाथ केजगिर,उमेश उबाळे,योगेश माळी, मिथुन ढंगारे,किशोर माळी, सुनिल राऊत,नागेश गारुडे, सतीश श्रीरामवार, विष्णू गुंठाळ, मनोज शिरसाठ, गणेश हिवाळे योगेश घोडके,,अर्जुन शेळके आदींनी रक्तदान शिबिरात मोलाची कामगिरी करून शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Previous articleजामोद महसूल मंडळातील संत्रा पिकाच्या विम्यापासून व कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनसाठी लढा उभारणाऱ्याची गरज- प्रशांत डिक्कर…
Next articleराज्यपाल नियुक्त विधान परिषदेत काँग्रेस पक्ष तर्फे मुस्लिम समाजातून प्रतिनिधित्व देण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here