Home Breaking News साखरखेर्डा ते गुंज रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अर्धवट टाकून मजूर पसार !रस्ता त्वरित...

साखरखेर्डा ते गुंज रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अर्धवट टाकून मजूर पसार !रस्ता त्वरित सुरू करावा अन्यथा चक्का जाम आंदोलन करू -भाजपचे वैभव तुपकर यांचा इशारा ‘

448
0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा ते गुंज रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तसेच खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते परंतु अचानक पणे रस्त्यावर गिट्टी चे मोठाले खडे टाकून मजूर गेल्या बारा दिवसांपासून पसार झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ‘संपूर्ण रस्त्यावर गिट्टी असल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांची मोटरसायकल घसरून पडली आहे !साखरखेर्डा ते गुंज या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे युवा नेते वैभव तुपकर यांनी दिला आहे त्यांनी असे सांगितले की रस्त्याचे काम हे पूर्ण व्हायला हवे होते परंतु अचानक रस्त्यावर गिट्टी टाकून मजूर पसार झाली आहे नेमके अर्धवट कामामुळे अनेक वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेकजण मोटारसायकल घसरून पडली आहे अनेक जण जखमी झाले आहे !अशा परिस्थितीमध्ये अर्धवट काम करणे योग्य नाही .तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करून तातडीने गुंज ते साखरखेर्डा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे ‘तसेच शिंदी ते साखरखेर्डा रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले आहे त्याची सुद्धा चौकशी करावी अशी मागणीही यावेळी वैभव तुपकर यांनी केली आहे !अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे !

Previous articleखाजगी वाहनाने प्रवास करीत असताना मोबाईल खिशातून लंपास !
Next articleगळफास घेऊन तरुणांची आत्महत्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here