साखरखेर्डा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळे न्यायाधीशाच्या भूमिकेत ! अनेक घरगुती तंटे जागच्याजागी मिटवले !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे मागील ठाणेदार संग्राम पाटील यांच्या जागी बुलढाणा येथून आलेले श्री जितेंद्र आडोळे ‘यांना जेमतेम दोन महिने झाले असतील ‘या दोन महिन्याच्या अल्पशा कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या !त्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुकी होय !ग्रामपंचायत म्हटलं तर शुल्लक कारणांवरून भांडणे होतात अनेक ग्रामपंचायत चे वाद साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये आले होते ‘ वाद म्हटल्यावर एकमेकाची पोलिसात तक्रार केल्यानंतर दाखल होणारे गुन्हे आणि त्यानंतर हे प्रकरण न्यायालयामध्ये जाते ‘परंतु या सर्व गोष्टींचा विचार करताना ठाणेदार श्री या आडोळे यांनी दोन्ही फिर्यादीने अगदी बारीक गोष्टी समजून समजून पुढे भांडणाचे कशाप्रकारे रूपांतर होते !या सर्व गोष्टी ती पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या प्रत्येक तक्रार करत्याला ते सांगत असतात ‘आणि त्याचाच परिणाम म्हणून मोठमोठ्या वादात होऊ घातलेले भांडणाचे रुपांतर क्षणातच त्यांनी मिटवले ।दारू पिऊन नवरा बायकोचे होणारे वाद त्यांनी सहज मिटवले !एवढेच नव्हे तर अतिशय गाजलेले प्रकरण अंडे का फंडा होय ।मुलाला दोन बॉयलर अंडे पत्नीने दिले म्हणून नवऱ्याने पत्नीला मारले व पत्नी ने थेट पोलिस स्टेशनच गाठले ।या ठिकाणी ठाणेदार श्री आडोळे यांनी फिर्यादी महिलेच्या भावाची भूमिका तर मुलाच्या मामाची भूमिका चातुर्याने निभावून ।महिलेच्या नवऱ्याला बॉयलर अंडे आणून दिले व प्रकरण मिटवले !असे अनेक घरगुती प्रकरण मोठमोठाले संवेदनशील प्रकरण ठाणेदार श्री आडोळे पोलीस स्टेशन मध्ये मिटवून ‘इतर पोलिस स्टेशनला एक आदर्श घालून देत आहेत :या ठिकाणी ते न्यायाधीशाची भूमिका पार पाडत आहे !यामुळे श्री आडोळे यांचे संपूर्ण परिसरामध्ये कौतुक होत आहे 1 – – – — — — — — — !प्रत्येक फिर्यादी हा न्याय मिळेल या आशेने पोलीस स्टेशन मध्ये येत असतो त्या प्रत्येकाचे तक्रारीचा निपटारा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे प्रकरण समस्या मिटली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहे !निश्चितच यामुळे लोकांचा पोलीस स्टेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल – – – – –श्री जितेंद्र आडोळे ठाणेदार (साखरखेर्डा पोलीस स्टेशन )

Leave a Comment