सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सिदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा तालुक्याची मागणी ही गेल्या बारा वर्षापासून जुनी आहे साखरखेर्डा तालुका जेव्हा होईल तेव्हा ! ची गोष्ट आहे ।साखरखेर्डा या गावाशी ५२ खेडे जोडलेली आहे ‘शाळा ,महाविद्यालये ,दवाखाने, तलाठी कार्यालय, असे अनेक कार्यालय महत्त्वाचे ठिकाणी साखरखेर्डा आहे,परंतु ज्या शेती संबंधित कार्यालय आहे ते म्हणजेच तलाठी कार्यालय होय !गेल्या अनेक वर्षापासून साखरखेर्डा येथे तलाठी कार्यालयाची स्वताची इमारतच नाही !ही वस्तुस्थिती आहे ‘तलाठी कार्यालय हे अनेकदा या इमारतीतून त्या इमारतीमध्ये पाच -पाच – चार – चार वर्षासाठी स्थलांतरित झाली आहे ।त्यामुळे अचानक स्थलांतरित झाल्यामुळे अनेक लोकांना नेमके तलाठी कार्यालय गेले कुठे हा प्रश्न पडतो लोक तलाठी कार्यालयाची शोधा-शोध करतात !अगोदर तलाठी कार्यालय हे खाजगी इमारतीमध्ये होते त्यानंतर तलाठी कार्यालय हे नवीन ग्रामपंचायत इमारतीमध्ये गेले ‘तेथून ते परत आता मानकर यांच्या कॉम्प्लेक्समध्ये आले !परंतु असतात तलाठी कार्यालय बदलल्यामुळे अनेक लोकांची गैरसोय होत आहे :त्यामुळे साखरखेर्डा हे मोठे गाव असूनही तिथे तलाठी कार्यालयाची स्वतःची इमारत नाही ‘म्हणून साखरखेर्डा येथे लवकरात लवकर तलाठी कार्यालयाची स्वतःची इमारत बांधून द्यावी अशी मागणी तलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत पौधे यांनी केली आहे ! – ( – -साखरखेर्डा हे गाव भौगोलिक दृष्ट्या खूप मोठी आहे तलाठी कार्यालयाची स्वतःची जागा इमारत शासनाने बांधून द्यावी अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही करत आहोत !लवकरात लवकर तलाठी कार्यालय इमारत बांधून मिळावी ही अपेक्षा -श्री प्रशांत पौंधे जिल्हा उपाध्यक्ष तलाठी संघटना बुलढाणा )