सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत तसेच अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे डॉक्टर राजेंद्र शिंगणे गटाचे परिवर्तन पॅनेलने ग्राम विकास पॅनलचा 16विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकाने पराभव केला ।राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन पॅनलचे तब्बल 16 उमेदवार हे विजयी झाले आहे तर त्यांचा एकच उमेदवार पराभूत झाला आहे !विजयी उमेदवारांमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान जि प सदस्य राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामभाऊ जाधवयांची सून सौ ज्योती अमित जाधव ह्या वार्ड क्रमांक एक मधून तब्बल 667 मतांनी विजयी झाल्या आहेत !त्यांचीही विजयाची आघाडी ही विदर्भातील कुठल्याही ग्रामपंचायत पेक्षा जास्त आहे
यामध्ये वार्ड क्रमांक 1 मधून विजयी झालेले उमेदवार खालील प्रमाणे
सौ ज्योती अमित जाधव ।सुरमाबी मुस्तफा शहा ‘कुरेशी शेख आयुब शेख मुसा ‘वार्ड क्रमांक दोन मधील विजयी उमेदवार -सौ अंकिता संग्रामसिंह सरगैमे ।शेख युनुस शेख अनिस ‘उल्हास प्रभाकर देशपांडे ।वार्ड क्रमांक तीन मधील विजयी उमेदवार ‘ –
सौ सुनिता दिलीप बेंडमाळी ‘श्रीमती कौशल्याबाई मंडळकर ‘वार्ड क्रमांक चार -सौ सुमन सुनिल जगताप ‘सौ शारदा प्रवीण पाझडे ‘सय्यद रफिक सय्यद अक्रम ‘ वार्ड क्र. ५ गंगुबाई कमलाकर गवई ‘संतोष श्रीकिसन जयस्वाल ‘वार्ड क्रमांक ६ दाऊद कुरेशी देवानंद खंडागळे’माजी सभापती राजू ठोके यांची आई लिलाबाई ठोके अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटाने विजय संपादन केला आहे तर ‘ग्राम विकास पॅनलचे उमेदवार सौ संगीता संदीप खिल्लारे ‘ह्या एकमेव विजयी झाले आहेत ।या सर्व विजयी उमेदवारांचे पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अभिनंदन केले आहे ‘तर सर्वांनी शांततेचे सहकार्य करावे असे आव्हान साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केली आहे ।