सावखेडा सिम येथे आदीवासी भुमीपुत्राची देशाच्या रक्षणासाठी बिएसएफ मध्ये निवड ग्रामस्थांनी केले त्याचे कुटुंबासह सत्कार

 

 

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे देशाच्या रक्षणासाठी बीएसएफ सेवे मध्ये रुजु होण्यासाठी जाणाऱ्या गावातील आदीवासी जवानांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला .आज सकाळी ११ वाजता सावखेडा सिम ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थित आशीर्वाद फाउंडेशन तर्फे नुकताच बी एस एफ मध्ये रुजू होत असलेल्या जवानाचा सत्कार करण्यात आले गावातील राहणारे असलम अमिन तडवी हा एकमेव तरुण बीएसएफ च्या सेवेच्या भरतीत रुजू होत आहे त्या आनंदाने आशीर्वाद फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य यांच्या उपस्थित हा सत्कार सोहळा पार पडला याप्रसंगी जवानाचे मोठे वडील शावखा तडवी वडील अमिन तडवी यांचाही ही सत्कार करण्यात आला, या प्रसंगी आशीर्वाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून देशाच्या रक्षणासाठी जाणाऱ्या आपल्या मातीतला आदीवासी भुमीपुत्राबाबत आपणास अभीमान वाटत असल्याचे बोलुन त्यांच्या कुटुंबाचे विशेष कौतुक केले. यावेळी उस्मान तडवी, लक्ष्मण बडगुजर ,मुस्तफा तडवी, बेबाबाई पाटील, सिकंदर तडवी, साधना तडवी ,नबाब तडवी, नसीमा तडवी, रजिया तडवी, मुबारक तडवी , अभिजीत साळवे, वर्षा पाटील, फातमा तडवी, अलिशान तडवी यांचेसह अनेक तरुण व सावखेडा सिम गावाचे ग्रामस्थ समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Comment