सिलोड प्रतिनिधी सागर जैवाळ
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवन चरित्राचा जागर करण्यासाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या संकल्पनेतून सात दिवसीय प्रवचनमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू उबाळे (मामा) व महिला जिल्हाअध्यक्ष मंजूषा ताई महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संतशिरोमनी सावता महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा सर्वत्र मोठया व्यापक प्रमाणावर साजरा होत असतो. तथापि, मागील दोन वर्षांपासून कोव्हीडच्या कठोर निर्बंधामुळे जाहीर स्वरूपाचे उपक्रम अथवा उत्सव घेता येत नाहीत. मात्र अशाही परिस्थितीत सावता महाराजांच्या जीवन चरित्राचा जागर झाला पाहिजे. त्यांच्या विचार-आचार आणि कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी या फेसबुक लाईव्ह प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सावता परिषद फेसबुक पेजवरून दि.१ ऑगस्ट रोजी गायनाचार्य ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे (बारामती), दि.२ ऑगस्ट रोजी विनोदाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे(नेवासा), दि.३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनीताताई महाराज आंधळे(आळंदी), दि.४ ऑगस्ट रोजी किर्तनकेसरी ह.भ.प. प्रा. सागर महाराज बोराटे(नातेपुते), दि.५ ऑगस्ट रोजी भाषाप्रभु ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील(भिवंडी), दि.६ ऑगस्ट रोजी समाजप्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी(नंदुरबार), दि.७ ऑगस्ट रोजी प्रेममुर्ती ह.भ.प. समाधान महाराज शर्मा(केज) या महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकार मंडळींचे सावता महाराजांच्या अभंगावर रोज सांयकाळी ७ ते ८ या वेळेत प्रवचने होणार आहेत.
शनिवार दि.७ ऑगस्ट रोजी सावता महाराजांच्या पुण्यतिथीदिनी सकाळी ११ वा. सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. दत्तात्रय मामा भरणे शुभेच्छा संदेश देणार आहेत. सावता महाराजांच्या संजीवन समाधीचे लाईव्ह दर्शन ठिक ११.३० वाजता तर दुपारी ठीक १२ वा. भजनसम्राट ह.भ.प. सदानंद महाराज मगर(पैठण) यांच्या स्वरांनंद कला अकॅडमी प्रस्तुत संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.प्रा. प्रभू महाराज माळी हे करणार आहे
तरी या फेसबुक लाईव्हद्वारे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचे असे अवाहन सावता परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष जगदीश बुलबुले व युवा जिल्हाध्यक्ष सागर जैवळ ,जिल्हा कार्यअध्यक्ष प्रमोद गायके यांनी केले आहे.