गजानन सोनटक्के जळगाव जा
तालुक्यात शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट होत चालली असून हळूहळू सर्वच पिके हातातून गेली असून एकमेव कपाशी पिकाच्या भरवशावर दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न पहात असतानाच अचानक बोंड अळी चा जोरदार अटॅक कपाशीवर आला आणि शेतकऱ्याचे एकरी सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले असून त्यामुळे बळीराजाची दिवाळी अंधारात जाणार आहे. शासना कडून मात्र कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही.
तालुक्यातील सूनगाव परिसरात बोंड अळी आल्यामुळे हिरवीगार कपाशी उपटण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी लावला आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने हंगाम बरा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे सर्वांनी शेती पिकावर भरपूर खर्च केला. सुरुवातीला मुग, उडीद गेले. त्यानंतर तीळ, आणि सोयाबीन वर रोटावेटर मारले आता कापूस किमान एकरी १० क्विंटल होईल असा अंदाज बांधून अतिशय महागडी औषधे फवारून कपाशी बहरली परंतु बी टी कापसावर बोंड अळी आल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविण्यात आला . हताश झालेला शेतकरी आणेवारी च्या कचाट्यात सापडला आणि शासन मदती पासून सुध्दा वंचित राहिला. कोणत्याच पिकाचा आधार राहिला नसल्याने ( ऊपट पऱ्हाटी अन् पेर गहु) अशा नादाला आता शेतकरी लागला असून आपला देश कृषी प्रधान असल्याचा विश्वास उडाला आहे. सर्व मार्गांनी शेतकऱ्यांची गोची होत असल्याने