Home नाशिक सैनिकाचा सेवानिवृत्ती समारोह जातेगांव येथे उत्साहात साजरी .

सैनिकाचा सेवानिवृत्ती समारोह जातेगांव येथे उत्साहात साजरी .

454
0

सचिन पगारे
मो.९९२२७८३४२१
नांदगांव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील जवान हवालदार दादा तुकाराम पेहरकर यांचा सेवानिवृत्ती समारोह उत्साहात संपन्न झाला .
भारतीय सैन्यदलात सेवेत राहून विविध आव्हानांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे शूरवीर,देशप्रेमी आपले जवान भारतमातेचे भूषण आहेत,असे हे जवान त्या-त्या गावचा अभिमानच असतात.
नांदगाव तालुक्यातील ‘फौजींचे गांव’ म्हणून ओळख असलेल्या घाटमाथ्यावरील जातेगांव येथील भुमीपुत्र जवान
हवालदार दादा तुकाराम पेहरकर हे आपल्या २६ वर्षांच्या लष्करीसेवेनंतर निवृत्त झाले. जवान दादा पेहरकर हे सन २४ डिसेंबर १९९४ मध्ये भारतीय सैन्यदलातील आॅर्डिनन्स फॅक्टरी मध्ये दाखल झाले होते. आपल्या २६ वर्षांच्या यशस्वी सेवेनंतर ते आपल्या जातेगांवी परतले.
गावातील आजी -माजी सैनिकांच्या मार्गदर्शनातून देशभक्तीमय गीतांत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील तमाम नागरिकांनी त्यांचे औक्षण व सत्कार करून भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सेवापूर्ती समारोहाचे आयोजन गावातील श्रीविठ्ठल- रुक्मिणी मंदिरात करण्यात आले. गावातील ग्रामपालिका कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला . तसेच उपस्थित आजी – माजी सैनिकांचा देखील सत्कार ग्रामस्थांकडुन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पवार यांनी केले. आहेर सर, संदीप पवार, विजय पाटील , गुलाब चव्हाण, सोपान खिरडकर यांनी आपले मत व्यक्त करत जवान दादा पेहरकर यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या .आजी-माजी सैनिकांनीही त्यांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या सेवापूर्ती समारोहात गावातील लष्करी व पोलिस दलातील कार्यरत जवान, शिक्षकवर्ग, व्यापारी, तरुणवर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Previous articleसावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शिंदी येथे महिलांसाठी उद्योग कार्यशाळा संपन्न 
Next articleसुनगाव ग्रामपंचायत साठी आलेल्या 50 अर्जापैकी 7 अर्ज माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here