स्त्री शिक्षणाची स्फृर्तीनायिका सावित्रीबाई फुले.

 

त्या काळात भारतीय समाजात असलेल्या वर्ण व्यवस्थेच्या प्रभावामुळे समाजात मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा अभाव होता.

या भारतीय समाजव्यवस्थेला खडखडून जागे करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले.अज्ञान,अंधश्रद्धा,रूढी, प्रथा,परंपरा या सारख्या अनेक कारणांमुळे या भारतातील स्त्रीयांचे जिवन हे खुप दैन्य अवस्थेत होते.

आपल्या देशातील स्त्री ही शिकली पाहीजे,या भारतीय समाज व्यवस्थेत तीला मान-सन्मान मिळाला पाहिजे,ही समाज व्यवस्था बदलायला हवी यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी मोठा संघर्ष त्याकाळी केला.

जोतीराव फुले याच्या खात्याला-खांदा लावून सावित्रीबाई फुले यांनी काम केले.भारतीय स्त्री शिक्षणासाठी त्यानी भारतात सर्व प्राथम पुण्यातील भिडेवाडा येथे ०१ जानेवारी १८४८ ला पहीली मुलांची शाळा काढली.

आणि सामाजिक क्रांतिला सुरूवात केली.त्या शाळेत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका म्हणून मुलीला ज्ञान व आमृत दिले.

या कार्यात त्याना उच्च वर्णीय लोकांचा चिखल,शेनाचा मारा सहन करावा लागला.महात्मा फुले यांच्या विचारांचा,कर्तृत्वाचा झेंडा आयुष्यभर तळमळीने फडकायचे काम त्यानी केले.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ०३ जानेवारी १८३१ ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला.त्याच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे व आईचे नाव सत्यवती होते.

त्या लहान पणापासुन सावित्रीबाई फुले निरोगी मनाच्या व स्वतंत्र विचारसरणीच्या होत्या.त्यानी केलेले संघर्षामुळे आज महीला शिक्षणात व नोकरीत पुरूषांच्या बरोबरीने पावले टाकत आहे.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे चिकित्सा शिक्षक होते.

आजच्या शिक्षणातून मुले स्वभिमानी-अभिमानी बनतात का याचा विचार पालकांनी करावा.या सर्व परीवर्तनवादी महापुरुषांचा ईतिहास तरूणाने वाचायला हवा.

समाजातील महीलाची उद्याची स्थिती टिकवण्यासाठी,टिकण्यासाठी सरकारने प्रयत्नशील राहावे.असेच या ठिकाणी म्हणवे लागेल.

शिवव्याख्याते,कृष्णा गाडेकर-उमरी,तालुका जिल्हा जालना-7350773253.

Leave a Comment