स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या उपोषणाची सांगता

 

वरवट बकाल ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्या लेखी पत्राने अतिक्रमण धारकांना सहानुभूती

 

संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर स्वातंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने वरवट बकाल येथील अतिक्रमण धारक यांना ग्रामपंचायत वरवट बकाल यांच्याकडून काही लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या#warvatbakal

त्या कारणाने तहसील कार्यालय संग्रामपूर येथे मागील दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 पासून अमरण साखळी उपोषणाला बसलेल्या ठिकाणी धारक यांना आज दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नवले व सोनवणे तसेच वरवट बकाल ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली आहे

 

वरवट बकाल ग्रामपंचायत अंतर्गत असलेले सर्व अतिक्रमण काढण्यापूर्वी उपोषण  करत्यांना ग्रामपंचायत मध्ये बोलवण्यात येईल व ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांसमोर या विषयाबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात येईल

वरवर बकाल ग्रामसेवक दुबे.

👇👇👇👇👇👇

वरवट बकाल यांना प्रत देऊन सुचीत करण्यात येते की, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या सोनाळा रोड ते कृषि उत्पन्न बाजार समिती व ग्रामिण रुग्णालयाच्या उत्तर संरक्षण भितीला लागून असलेल्या अतिक्रमीत दुकाना बाबत नियमानुसार योग्य कार्यवाही करावी व उपोषण कर्ते यांना साखळी उपोषणापासून परावृत्त करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

गट विकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर#panchayatsamiti

Leave a Comment