हिंगणघाट बस स्टॅन्ड वर सोन्याचे दागिने चोरणारी महिला टोळी

 

हिंगणघाट :- बस स्टॅन्ड वरील सोन्याचे दागिणे चोरनारी नागपुर येथील अट्टल महिला टोळी हिंगणघाट येथील डी. बी पथकाने अटक करून त्यांचेकडुन (सोने 12तोळा बीलानुसार) 2,80,000 रू. चा सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले.
घटना :- दि. 31 जुलै रोजी फिर्यादी सौ. कान्ता ज्ञानेश्वर झोरे या त्यांचे नातेवाईकांचे वास्तुशांती करीता वर्धा येथे जात असता, हिंगणघाट बस स्टॅण्ड वर फिर्यादीने त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले 12 तोळे सोन्याचे दागिणे बस मध्ये बसत असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले. फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे ला अपराध क्र. 0884 / 2022 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हा दाखल होताच पो.स्टे. हिंगणघाट येथील पोहवा शेखर डोंगरे यांच्या गुन्हे प्रकटीकरण प्रथकास सदर गुन्हयाचा तपास सोपविण्यात आला. त्यांनी हिंगणघाट शहर, यवतमाळ, वणी, वरोरा, पाढरकवडा व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन अनोळखी आरोपीतांचा शोध घेतला असता. सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) सौ. मालाबाई मनोहर मानकर वय 42 वर्षे 2) सौ. कविता जतन नाडे वय 40 वर्षे 3) कु. संगीता कन्ना नाडे सर्व रा. शताब्दी नगर, रामेश्वरी टोली, अजनी, नागपुर यांना ताब्यात घेवुन त्यांना अटक करून, त्यांचा पिसिआर घेण्यात आला. पिसिआर काळात सर्व महिला आरोपींता कडुन गुन्हयात चोरीस गेलेले संपुर्ण सोन्याचे दागिणे जु.कि. 2,80,000 रू. चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलास पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत पाटणकर, पोउपनि सोमनाथ टापरे. डि. बी. पथकाचे पो. हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, पोशि संग्राम मुंडे, मनापोशि प्रेमिला गुजरकर यांनी केली आहे.

Leave a Comment