हिवरखेड पोलिसांनी केला मोठ्या प्रमाणात अवैध तांदूळसाठा जप्त,

 

राशनचा काळाबाजार करणाऱ्या दोन अट्टल आरोपीसह मोठे वाहन जप्त,

हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव बु येथे हिवरखेड पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मोठ्या प्रमाणात अडगाव येथील काजीपुरा माजिद जवळ राशनचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना पोलीसांनि रंगेहाथ अटक केली, आरोपी जवळून ४० किटल तांदूळ साठा जप्त करण्यात आला, त्यामध्ये ३ लाख रुपये किंमतीचे मोठे वाहन सुद्धा जप्त करण्यात आले, असा एकूण ४,४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,आरोपी अजमत खा,रहेमत खा, रा,अडगाव बु, राजेश संगीतराव भुजवन,रा बार्शीटाकळी, हे दोन आरोपी राशनचा काळा बाजार करत असताना आढळून आले,याच्या विरुद्ध कलम ३/७ जीवन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, फिर्यादी निलेश कात्रे पुरवठा निरीक्षक तेल्हारा यांच्या माहितीवरून सदर आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली, पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे पी,एस,आय बगळेकर करीत आहेत,

Leave a Comment