Home Breaking News हिवरखेड पोलीस ठाण्यात युवकाने केले विष प्राशन अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा होता...

हिवरखेड पोलीस ठाण्यात युवकाने केले विष प्राशन अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा होता युवकाचा हट्ट

1108
1

 

हिवरखेड प्रतिनिधी:- दिपक रेळे

तळेगाव बाजार येथील युवकाने हिवरखेड पोलीस स्टेशन च्या प्रांगणातच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळेगाव बाजार येथील विकास बाळकृष्ण घनबहादुर या 21 वर्षीय तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध मागील काही वर्षांपासून सुरू होते.

 

ही बातमी आवर्जून पहा

“अर्जुन देशपांडेंच्या जेनरिक आधार च्या माध्यमातून अमरावती मध्ये स्वस्तात औषधं उपलब्ध होणार “

 

दोघांचा प्रेम विवाह करण्याचा मानस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या पालकांचा यास विरोध होता.

परंतु सदर युवक अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याचा हट्ट करीत होता. त्यामुळे सदर प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले. मुलगा मुलगी आणि दोघांचे पालक पोलीस स्टेशनला हजर झाले होते.

मुलगी अल्पवयीन असल्याने मुलगी सज्ञान होईपर्यंत कायद्यानुसार विवाह करता येत नाही असे पोलिसांनी युवकाला समजावून सांगितले. परंतु प्रेमात आंधळा झालेला युवक कुणाचीही गोष्ट समजण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्याने शेवटी टोकाचे पाऊल उचलत पोलीस स्टेशनच्या प्रांगणातच विष प्राशन केले.

सदर घटनेने एकच खळबळ उडाली होती. हिवरखेड पोलिसांनी तात्काळ सदर युवकाला प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

याप्रकरणी हिवरखेड पोलीस चौकशी करीत असून कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की सदर प्रेमीयुगुलाने काही महिन्यांपूर्वी सुद्धा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

परंतु दैव बलवत्तर म्हणून ते बचावले अशी माहितीसुद्धा अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिली आहे.

Previous article“अर्जुन देशपांडेंच्या जेनरिक आधार च्या माध्यमातून अमरावती मध्ये स्वस्तात औषधं उपलब्ध होणार “
Next articleसाखरखेर्डा गावचे आरक्षण कायम !सिंदखेडराजा तालुक्यातील ८० ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर ! ८ गावचे आरक्षण बदलले ! ३९ सर्वसाधारण ‘ 1 अ . जमाती ‘ २२ नामप्र . तर १८ अ . जाती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here