Home Breaking News हिवरखेड पोलीस स्टेशनचा कार्यभार पूर्ववत सुरु

हिवरखेड पोलीस स्टेशनचा कार्यभार पूर्ववत सुरु

272

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

 

काही दिवस अगोदर हिवरखेड येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली होती त्यामुळे हिवरखेड पोलीस स्टेशन तात्पुरते बंद करण्यात आले होते. येथील कामकाज तेल्हारा पोलिस ठाण्यातून सुरु होते.
हिवरखेड परिसरातील नागरिकांना पोलीस तक्रार करायची असल्यास हिवरखेड वरुन तेल्हारा येथे खराब रस्त्याने येने-जाने हे तारेवरची कसरत करण्या बरोबर होती. परंतु आता हिवरखेड पोलीस स्टेशन दिनांक 1 सप्टेंबर मंगळवार सायंकाळ पासून पूर्ववत सुरु करण्यात आलेले आहे तरी हिवरखेड आणि हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील नागरिकांनी कुठलीही पोलीस तक्रार करायची असल्यास हिवरखेड पोलिस स्टेशन येथे निसंकोच तक्रार करावी असे आवाहन ठाणेदार आशिष लवंगळे यांनी केले आहे.