Home Breaking News हिवरा आश्रम – चिखली रोडवरील पिंपळगाव उंडा येथे ट्रक व मोटरसायकलचा भीषण...

हिवरा आश्रम – चिखली रोडवरील पिंपळगाव उंडा येथे ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघातात एक गंभीर जखमी.

595
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सविस्तर माहिती अशी की चिखली – मेहकर रोड वर हिवरा आश्रम लगतच पिंपळगाव उंडा या फाट्यावर दि . ९ जानेवारी ला रात्री ७ . 30 वाजताच्या दरम्यान ट्रक क्रमांक एम एच 23 7275 व मोटरसायकल क्रमांक एम एच 28 AQ 1053 क्रमांकाच्या मोटर सायकलचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटर सायकल स्वार रवी अंभोरे राहणार पिंपळगाव उंडा गंभीर जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने मेहकर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहे. अपघात इतका जबरदस्त होता की या अपघातामध्ये मोटर सायकलची सुराळा झाला आहे तसेच मोटरसायकलस्वार सुद्धा मोटरसायकलवरून उडून रस्त्याच्याकडेला फेकला गेला आहे चिखली कडून मेहकर कडे जाणाऱ्या भरधाव वेगाच्या ट्रक ने मोटरसायकल धडक दिल्याने हा अपघात घडला. परंतु घटनास्थळावरून ट्रक ड्रायव्हर अपघात घडला तेव्हा पसार झाला. बातमीचे वृत्त कळेपर्यंत अजून कुठलाही गुन्हा ट्रक चालकावर दाखल करण्यात आला नव्हता. मोटर सायकलस्वार रवी अंभोरे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने मेहकर येथील रुग्णालयात नेले असून उपचार सुरू आहे.

Previous articleकोंढाळी भागात शेकडो पक्षांचा मृतु
Next articleमुख्यमंत्री ठाकरे,खा.प्रफुल पटेल आज भंडारा येथे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here