Home Breaking News होय ही बातमी खरी आहे “ती”, च्यापासून मला दोन लेकरं

होय ही बातमी खरी आहे “ती”, च्यापासून मला दोन लेकरं

1384
0

 

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो

माझ्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला माझ्या दोन मुलांची आई , ना , धनंजय मुंडे

 

मला ब्लॅकमेल करण्यासाठी तक्रार ,

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणाची चर्चा सुरु झाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे.

“माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे तसेच मला ब्लॅकमेल करणारे आहेत” असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी स्वत:च या प्रकरणाची वस्तुस्थिती सांगितली आहे.

काय म्हटले आहे धनंजय मुंडे यांनी
एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.
सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत.
मात्र 2019 पासून सदर महिला त्यांची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ देखील सहभागी होता.
मोबाईल वरून ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएसचे पुरावे माझ्याकडे आहेत. दबाव तंत्राचा सुद्धा हा भाग असू शकतो. या सर्व प्रकरणाची संबंधीतांकडून योग्य चौकशी केली जाईल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleअखेर साखरखेर्डा ते शिंदी रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु !
Next articleमाझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील, अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याची पत्नीने शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here